बांगलादेशामध्ये आश्रया साठी गेलेल्या रोंहिग्या मुस्लीमांना पुन्हा म्यानमारला पाठविण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील अभियानामध्ये १ लाख रोहिंग्या मुस्लीमांना मायदेशी पाठविण्यात येणार आहे. बांगलादेशाचे मंत्री ओबेदुल कादर यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी ओबेदुल कादर यांनी म्यानमार प्रशासना बरोबर चर्चा करून रोहिंग्या मुस्लीमांना पुन्हा मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी एक लाख रोहिंग्या मुस्लीमांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी म्यानमार प्रशासनाकडे पाठविण्यात आली असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews